मुंबई : मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना यंदा 14 हजार रुपये तर बेस्ट कर्मचा-यांना 5,500 रुपये बोनस मिळणार आहे. मुंबई महापालिकेच्या गटनेत्यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. मागच्या वर्षीपेक्षा यंदाचा बोनस पाचशे रुपयांनी वाढवण्यात आला आहे.
या बोनसचा लाभ महापालिकेच्या एक लाख नऊ हजार कर्मचाऱ्यांना तर बेस्टच्या 45 हजार कर्मचाऱ्यांना होणार आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही मागच्या वर्षीपेक्षा पाचशे रुपयांनी जास्त बोनस दिला जाणार आहे.