मुंबई : मुंबई महापालिकेच्या एकूण २४ वॉर्डच्या कार्यालयांमध्ये तुम्हाला एकच बोंबाबोंब सध्या ऐकायला येणार आहे, ती म्हणजे सर्व्हर डाऊन आहे, यामुळे नागरी सुविधा केंद्रातील आर्थिक व्यवहार ठप्प आहेत. यामुळे तुमचं पैसे भरण्याचं कोणतंही काम होणार नाही. मुंबईकर मात्र यामुळे हैराण झाले आहेत.
मात्र या खासगी कंपनीची मनमानी सुरूच आहे, कर्मचारी सरळ तीन दिवसापासून सर्व्हर डाऊन आहे, कंपनी काय करणार, वरळीचं सर्व्हर डाऊन आहे, असं सांगून मोकळे होतात. मुंबई महापालिकेकडून या कंपनीची कोणतीही कानउघाडणी केली जात नसल्याने, ही अवस्था झाली असल्याचं सांगण्यात येत आहे.
नागरी सुविधांचं तांत्रिक काम व्हीएफएस ग्लोबल या कंपनीकडे असल्याचं सांगण्यात येत आहे. या कामकाजाची ही अवस्था या कंपनीने कायमची अशीच केली असल्याचंही काही कर्मचारी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगतात. तक्रार अधिकारीही या विरोधात जास्त काही बोलत नसल्याचं चित्र आहे.