हायप्रोफाईल सुखदा-शुभदाच्या अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा

बड्या राजकीय नेत्यांच्या वास्तव्यामुळे प्रसिद्ध असलेल्या वरळीतील सुखदा-शुभदा सोसायटीतील अनधिकृत बांधकामावर पालिकेनं हातोडा टाकला. 

Updated: Feb 10, 2015, 07:52 PM IST
हायप्रोफाईल सुखदा-शुभदाच्या अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा title=

मुंबई: बड्या राजकीय नेत्यांच्या वास्तव्यामुळे प्रसिद्ध असलेल्या वरळीतील सुखदा-शुभदा सोसायटीतील अनधिकृत बांधकामावर पालिकेनं हातोडा टाकला. 

सर्वपक्षीय नेत्यांची या इमारतीत घरं आणि कार्यालयं आहेत. ही अनधिकृत बांधकामं पाडण्यासाठी पालिकेनं यापूर्वीच संबंधितांना नोटीस बजावली होती. यावेळी शुभदा सोसायटीतील एकूण तेरा दुकानगाळ्यांवर कारवाई करण्यात आलीय. यामध्ये काँग्रेसचे शिवराज पाटील चाकूरकर, रणजित देशमुख, रजनी पाटील, प्रतापसिंह मोहिते पाटील, दौलतराव आहेर या महत्वाच्या नेत्यांच्या दुकानगाळ्यांचा समावेश आहे. 

अशोक पाटील आणि रजनी पाटील यांचे पूर्णपणे अनधिकृत असलेले २  दुकानगाळेही पाडण्यात आलेत. तर ११ दुकानगाळ्यांमधील अंतर्गत अनधिकृत बांधकामावर पालिका कर्मचाऱ्यांनी हातोडा चालवला. बड्या नेत्यांची ही बांधकामं असल्यानं मुंबई महापालिका कारवाई करण्यासाठी वेळकाढू धोरण अवलंबत होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.