मुंबई: मुंबई मेट्रोच्या तिकीट दरवाढीविरोधात राज्य सरकारनं दाखल केलेली याचिका फेटाळत मुंबई हायकोर्टानं मेट्रोच्या दरवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळं राज्य सरकारला दणका बसला असला तरी रिलायन्सला मात्र दिलासा मिळाला आहे.
मुंबई मेट्रोचे सध्याचे दर १०, १५ आणि २० रुपये असे आहेत. तर मेट्रोचे प्रस्तावित दर १०, २०, ३० आणि ४० रुपये इतके आहेत. मात्र अंतिम दर निश्चित करण्याचा पूर्ण अधिकार शुक्ल निर्धारण समितीलाच राहणार आहेत.
३१ जानेवारीपासून पुढे ३ महिन्यात हे दर ठरवण्याची मुभा समितीला देण्यात आली आहे. तोपर्यंत रिलायन्स स्वत:च्या धोरणानुसार दर ठरवू शकते, असा आदेशही हायकोर्टानं दिला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.