मुंबईतील वाढीचा मालमत्ता कर प्रस्ताव मागे

मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता कर वाढीच्या प्रस्तावाला सर्व पक्षांनी कडाडू विरोध केल्यानंतर शिवसेनेनं माघार घेतल्याचं दिसतंय.

Updated: Jan 7, 2015, 09:39 PM IST
मुंबईतील वाढीचा मालमत्ता कर प्रस्ताव मागे title=

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता कर वाढीच्या प्रस्तावाला सर्व पक्षांनी कडाडू विरोध केल्यानंतर शिवसेनेनं माघार घेतल्याचं दिसतंय.

मालमत्ता कर वाढवून मुंबईकरांवर बोजा पडू देऊ नका अशा स्पष्ट शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापौरांना सूचना केली आहे. त्यामुळं मुंबईकरांना वाढीव मालमत्ता करापासून तात्पुरता दिलासा मिळालाय.

सर्व राजकीय पक्षांच्या सहमतीनंतर सखोल अभ्यास करून याबाबतचा निर्णय घेण्याच्याही सूचना उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यामुळे तूर्तास वाढीव कराचा बोजा मुंबईकरांवरील टळला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.