'ज्ञानपीठ' विजेते भालचंद्र नेमाडे यांची साहित्यसंपदा...

नुकतंच, ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेले भालचंद्र वनाजी नेमाडे आपल्या पहिल्या-वहिल्या कादंबरीपासून तरुणांमध्ये लोकप्रिय झाले. खान्देशातील सांगवी जिल्ह्यात जन्मलेल्या भालचंद्र नेमाडे यांची वयाच्या २५ व्या वर्षी आपली 'कोसला' ही कादंबरी प्रकाशित झाली. 

Updated: Feb 6, 2015, 03:12 PM IST
'ज्ञानपीठ' विजेते भालचंद्र नेमाडे यांची साहित्यसंपदा...  title=

मुंबई : नुकतंच, ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेले भालचंद्र वनाजी नेमाडे आपल्या पहिल्या-वहिल्या कादंबरीपासून तरुणांमध्ये लोकप्रिय झाले. खान्देशातील सांगवी जिल्ह्यात जन्मलेल्या भालचंद्र नेमाडे यांची वयाच्या २५ व्या वर्षी आपली 'कोसला' ही कादंबरी प्रकाशित झाली. 

'कोसला' हे पुस्तक त्यांच्या वयाच्या २५व्या वर्षी प्रकाशित झाले. कोसला ही पांडुरंग सांगवीकर या खेड्यातून आलेल्या व पुण्यात शिकणाऱ्या तरुणाची आत्मकथा आहे. ही कादंबरी सर्वसाधारण मराठी वाङ्मयप्रवाहाच्या बाहेरील कलाकृती मानली जाते...  

टीकास्वयंवर या टीकाशास्त्रावरच्या पुस्तकासाठी नेमाडे यांना १९९० साली साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसंच २०१३ साली कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कारही त्यांना देण्यात आला. 

पुस्तकं

कोसला(१९६३)

* जरीला(१९७७)

* झूल (१९७९)

* बिढार (१९६७)

* हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ (२०११)

* हूल
 
कविता संग्रह

देखणी 

* मेलडी (१९७०)

समीक्षा

टीकास्वयंवर

* तुकाराम 

* मुलाखती

* साहित्याची भाषा

* सोळा भाषणे

* Indo-Anglian Writing

* The Influence of English on Marathi : A Sociolinguistic and Stylistic Study

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.