रेल्वेखाली आल्याने महिलेचा मृत्यू, व्हिडिओ CCTV कैद

 मुंबईत बोरिवली स्थानकात चालत्या वडोदरा एक्स्प्रेसमधून खालीउतरण्याचा प्रयत्न करणाऱ्या 55 वर्षाच्या महिलेचा एक्स्प्रेसखाली येऊन मृत्यू झाला.

Updated: Jan 27, 2016, 06:21 PM IST

मुंबई :  मुंबईत बोरिवली स्थानकात चालत्या वडोदरा एक्स्प्रेसमधून खालीउतरण्याचा प्रयत्न करणाऱ्या 55 वर्षाच्या महिलेचा एक्स्प्रेसखाली येऊन मृत्यू झाला. किरण देवी कोठारी असं या दुर्दैवी महिलेचं नाव आहे.

वडोदरा एक्स्प्रेस १५ जानवारी रोजी बोरिवली स्टेशनला 3.50 वाजता आली आणि 4 वाजता निघाली. अचानक प्रवासी चालत्या ट्रेनमधून उतरू लागले आणि यावेळी महिलेनंही ट्रेनमधून उडी घेतली. महिलेचा तोल गेला आणि ती ट्रेनखाली आली. त्यामुळे किरणदेवी कोठारी यांचा मृत्यू झाला.

असा घडला अपघात 

 
मुंबई सेंट्रलहून सुरतला जाणा-या एका रेल्वेगाडीत एक कुटुंब प्रवास करत होतं. त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईकही याच गाडीत बोरीवलीहून पुढे प्रवास करणार होते. मात्र अपेक्षेप्रमाणं बोरीवली रेल्वे स्टेशनवर नातेवाईक गाडीत चढलेच नाहीत...

रेल्वेगाडी बोरीवलीसोडून पुढं निघू लागल्यानं कुटुंबातले सर्वच जण घाबरले आणि चालत्या गाडीतून उतरू लागले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. 

सुरूवातीला एक तरूण महिला खाली उतरली. त्यानंतर एका पुरूषाने उडी मारली. त्यानंतर तो एक एक करून बॅग खाली फेकत होता. त्यानंतर त्यांने किरण देवी कोठारी यांना खाली उतरविण्याचा प्रयत्न केला. पण गाडीने वेग घेतला होता. त्यात उलट्या बाजूने उतरण्याचा प्रयत्न करणाऱ्या किरण कोठारी यांचा तोल जाऊन त्या गाडी आणि प्लॅटफॉर्ममधील भागात पडल्या. तरूण व्यक्तीने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. पण त्या गाडीच्या वेगाने ओढल्या गेल्या. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x