चारित्र्याच्या संशयावरून शिक्षिकेची पतीकडून हत्या

अनैतिक संबंधाच्या संशयावरुन नवऱ्याने आपल्या पत्नीची हत्या केल्याची घटना खारघर सेक्टर-११ मधील केंद्रीय विहार सोसायटीमध्ये घडली. 

Updated: Jan 27, 2016, 01:43 PM IST
चारित्र्याच्या संशयावरून शिक्षिकेची पतीकडून हत्या title=

नवी मुंबई : अनैतिक संबंधाच्या संशयावरुन नवऱ्याने आपल्या पत्नीची हत्या केल्याची घटना खारघर सेक्टर-११ मधील केंद्रीय विहार सोसायटीमध्ये घडली. 

पुष्पा चित्तूर असं या ४० वर्षीय मृत महिलेचं नाव आहे. पुष्पा या खारघरमधील खाजगी शाळेत शिक्षिका होत्या.

पुष्पा यांच्या मोबाईलमध्ये त्यांचा पती श्रीनिवास चेत्तूर याला काही अश्लील मेसेज आणि फ़ोटो सापडले होते. त्यानंतर आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याची त्याची खात्री झाली.

यानंतर श्रीनिवास याची  रागाच्या भरात श्रीनिवास ने पुष्पाच्या डोक्यात हातोड्याने वार करुन तीची निर्घृण हत्या केली. खारघर पोलिसांनी याप्रकरणी श्रीनिवास याला अटक केली आहे.