मुंबई : आज राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईमध्ये महत्त्वाच्या पर्यटन स्थळांवर फ्री वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा केलीय.
यामुळे, महाराष्ट्राच्या पर्यटन व्यवसायाला चालना देण्याचा मानस यावेळी अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला. याशिवाय, महाराष्ट्रात स्मार्ट सीटी उभारण्यासाठी २६८ कोटी देणार असल्याची घोषणाही घोषणा अर्थमंत्र्यांनी केलीय.
मुंबईकरांसाठी आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबई मेट्रो-३ साठी १०९ कोटी ६० लाखांची तरतूद करण्यात आलीय.
पर्यटनाच्या आणि मुंबईकरांच्या सोईच्या दृष्टीने महिलांसाठी ई-टॅक्सीसाठी अनुदान देणार असल्याची घोषणाही यावेळी अर्थमंत्र्यांनी केली.
महाराष्ट्रातील सागरी किनारा पर्यटन विकासाठी ४२ कोटी देण्याची घोषणाही घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.