मुंबई : केंद्रिय मंत्री नितिन गडकरी यांनी दुबईतील बुर्ज खलिफापेक्षाही मोठी इमारत मुंबईत उभारण्याची इच्छा व्यक्त केली आहे, या इमारतीला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
मी कोणतीही घोषणा करत नाहीय, पण माझी अशी इच्छा आहे, मुंबईत जगातील सर्वात उंच इमारत बांधण्यात यावी, या इमारतीला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यात यावं.
नितिन गडकरी यांनी याविषयी आणखी बोलतांना सांगितलं की, छत्रपती शिवाजी महाराज टावरमध्ये ३० मजल्यांचं कन्वेशनल सेंटर, ३० फ्लोअर रेस्टॉरंट, २० फ्लोअर मॉल आणि काही पार्किंग फ्लोअरसाठी रिझर्व्हेशन ठेवण्यात येतील.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.