मुंबई: माझी पत्नी अंधश्रद्धेच्या आहारी गेली आहे, ती माझ्या ड्रिंक्समध्ये पावडर टाकते, ज्यामुळे मला दिवसभर गुंगीत असल्यासारखं वाटतं, असा आरोप युनायटेड फॉस्फरस कंपनीचे सीईओ जयदेव श्रॉफ यांनी केला आहे.
माझी पत्नी बंगाली बाबाच्या नादाला लागली आहे, त्यामुळे मला घटस्फोट मिळावा, अशी मागणीही जयदेव यांनी केली आहे.
दरम्यान याप्रकरणी जयदेव यांची पत्नी पूनम भगतविरोधात खार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूनम भगत यांनी मात्र या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
या प्रकरणाची सुनावणी 20 एप्रिलला वांद्र्याच्या कौटुंबिक कोर्टात होणार आहे. जयदेव आणि पूनम यांच्यामध्ये मतभेद झाल्यामुळे पूनमनं आपल्या मुलांसोबत घर सोडलं होतं. पण पुन्हा घरात येऊन बंगाली बाबाच्या नादाला लागून पूनम आपल्यावर जीवघेणा प्रयोग करेल, अशी भीती जयदेव श्रॉफ यांनी व्यक्त केली आहे.