दिवस अपघातांचा : सुमोला धडक, सात जण जागीच ठार

सुमो गाडीला झालेल्या अपघातात सात जण ठार जागीच झाल्याची घटना नवी मुंबईतल्या कळंबोली इथं घडलीय.

Updated: Mar 4, 2013, 09:37 AM IST

www.24taas.com, नवी मुंबई
सुमो गाडीला झालेल्या अपघातात सात जण ठार जागीच झाल्याची घटना नवी मुंबईतल्या कळंबोली इथं घडलीय.
सोमवारला अपघातांचं दूषण लागलंय. आज पहाटे ईस्टर्न एकस्प्रेसवर टँकरच्या झालेल्या अपघातानंतर आणखी एका अपघाताची बातमी हाती येतेय. कळंबोली इथं सुमो गाडीला झालेल्या अपघातात सात जण जागीच ठार झाले तर तीन जण गंभीर जखमी झालेत. सुमोतील प्रवासी ठाण्याहून कराडकडे परतत असताना काळानं त्यांच्यावर घाला घातलाय. पहाटे साडेतीन वाजता हा अपघात झालाय. एका अज्ञात वाहनानं सुमोला धडक दिल्याने हा भीषण अपघात घडलाय.
अपघातामुळं मृतांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. जखमींवर कळंबोलीच्या एम. जी. एम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
मृतांची नावं
सचिन बेळगे, तुळशीराम चोरगे, शेख मुजबीन, शेख जुबेर, शेखर, चंद्रशेखर नामधारी, शेख चाँदभाई
जखमींची नावे
मंगी लोडले, अर्जुन धरे, सुरेश कुमावत

दिवस अपघातांचा
> धुळ्यात मुंबई-आग्रा महामार्गावर झालेल्या अपघातात तीन सर्पमित्रांचा मृत्यू झालाय. समीर वैद्य, हर्षल निकुंभ, सुयोग आळंदे अशी या तिघांची नावं आहेत. शहराबाहेर असलेल्या गुरूद्वाराजवळ हा अपघात झालाय.
> पंजाबच्या जालंधरमध्ये स्कूलबसला झालेल्या अपघातात सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय. एका भरधाव ट्रकनं धडक दिल्यानं हा अपघात झाल्याचं सांगण्यात येतंय.