मध्य रेल्वे रोखली : प्रवाशांवर पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेक

कल्याण -ठाणे दरम्यान मध्य रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने संतप्त प्रवाशांनी दिवा स्थानकात रेल्वे रोको केला. यावेळी गर्दीला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली. यावेळी काही प्रवाशांनी गाड्यांवर दगडफेक केली. गेले तीन तास रेल्वे रोखून धरल्याने ठाण्याच्यापुढे लोकल धावलेल्या नाहीत.

BGR | Updated: Jan 2, 2015, 10:34 AM IST
मध्य रेल्वे रोखली : प्रवाशांवर पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेक title=

ठाणे : कल्याण -ठाणे दरम्यान मध्य रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने संतप्त प्रवाशांनी दिवा स्थानकात रेल्वे रोको केला. यावेळी गर्दीला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली. यावेळी काही प्रवाशांनी गाड्यांवर दगडफेक केली. गेले तीन तास रेल्वे रोखून धरल्याने ठाण्याच्यापुढे लोकल धावलेल्या नाहीत.

मध्य रेल्वे मार्गावर वारंवार रेल्वे बिघाडच्या घटना घडत असल्याने प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला. ठाकुर्ली इथे लोकलचा पेंटाग्राफ तुटल्याने CST कड़े जाणारी धीम्या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली. या कामासाठी दिवा - कल्याण दरम्यान धीम्या मार्गावरचे दोन्ही ट्रॅक बंद ठेवावे लागले. त्यामुळे ठाणेच्या पुढे डोंबिवली, कल्याण, कर्जत - कसाराच्या दिशेने रहणा-या रेल्वे प्रवाशांना रेल्वे बिघाडाचा फटका बसला.

गेल्या काही महिन्यात लोकल ट्रॅकवरुन घसरणे, सिग्नल यंत्रणेत बिघाड, ओवरहेड वायर तूटणे, लोकलमध्ये तांत्रिक समस्या निर्माण होणे अशा घटना वारंवार घडल्या आहेत. गेले दोन महीने मध्य रेल्वे ठाणे - कल्याण दरम्यान रविवारी मेगाब्लॉक घेत आहे. पुन्हा पुन्हा याच भागात समस्या का निर्माण होतात, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केल्यात.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.