मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत करण्यात यश आलं आहे. आज दुपारी साडेबारापर्यंत ही वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली. मात्र सकाळी मध्य आणि हार्बर रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले.
मध्य रेल्वेची वाहतूक आज पुन्हा विस्कळीत झाली होती. दिवा आणि मुंब्रा दरम्यान रूळाला तडे होते. यामुळे सलग दुसऱ्या दिवशी मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला.
स्लो-अपची वाहतूक अप फास्टवर टाकण्यात आली होती, सीएसटीकडे येणाऱ्या गाड्य़ा 20 मिनिटे उशीराने धावत होत्या.
हार्बर रेल्वेचीही रडारड
हार्बर रेल्वेची वाहतूकही 10-15 मिनिटं उशीराने सुरू आहे. हार्बरवर मानुखर्द ते वाशी दरम्यान रूळाला तडा गेला होता, ही घटना सकाळी साडे नऊच्या सुमारास लक्षात आल्याचं सांगण्यात येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.