मुंबईत मध्य रेल्वेच्या वाहतुकीचे तीन-तेरा

मुंबईतल्या चाकरमान्यांना आज मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबल्याने घरी पोहचण्यास उशीर होत आहे, अनेक ट्रेन मध्य रेल्वेच्या स्थानकावर थांबून आहेत, काही ट्रेन्स धिम्या गतीने सुरू आहेत, यामुळे मध्य रेल्वेच्या सर्व स्थानकांवर गर्दी होत आहे. तरीही मध्य रेल्वेने याची कोणतीही माहिती दिलेली नाही.

Updated: Apr 14, 2015, 08:18 PM IST
मुंबईत मध्य रेल्वेच्या वाहतुकीचे तीन-तेरा title=

मुंबई : मुंबईतल्या चाकरमान्यांना आज मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबल्याने घरी पोहचण्यास उशीर होत आहे, अनेक ट्रेन मध्य रेल्वेच्या स्थानकावर थांबून आहेत, काही ट्रेन्स धिम्या गतीने सुरू आहेत, यामुळे मध्य रेल्वेच्या सर्व स्थानकांवर गर्दी होत आहे. तरीही मध्य रेल्वेने याची कोणतीही माहिती दिलेली नाही.

मध्य रेल्वेची ही वाहतूक का खोळंबली आहे, यावर रेल्वेकडून कोणतंही उत्तर देण्यात येत नाहीय. प्रवाशांना प्रचंड त्रास होतोय, तसेच कोंडी सहन करावी लागतेय, थोड्या वेळाने वाहतूक पूर्ववत होईल असं सांगण्यात येतंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.