मुंबई : आता बातमी तुमच्या कामाची. मुंबईतल्या तिकीटांच्या रांगा कमी करण्यासाठी पेपरलेस तिकीट सुरु केल्यानंतर आता पेपरलेस पासही उपलब्ध होणार आहे.
सप्टेंबरमध्ये ही सुविधा रेल्वे प्रवाशांसाठी उपलब्ध होईल. त्यामुळं रांगेत उभं राहून पास काढण्याच्या त्रासातून मुंबईकरांची सुटका होणार आहे. याआधीच रेल्वे प्रवाशांसाठी मोबाईल तिकीट ही सुविधा सुरु आहे.
पश्चिम रेल्वेवर प्रवाशांना या सुविधेचा फायदा होतोय. लवकरच मध्य रेल्वेसाठी ही सुविधा सुरु होणार आहे.. त्यातल्या त्यात मुंबईत पासधारक प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळं लाखो मासिक आणि त्रैमासिक पासधारकांना पेपरलेस पास सुविधेचा फायदा होणार आहे. या पेपरलेस पासमुळं छापील पासची प्रत जवळ ठेवण्याची गरज भासणार नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.