मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

बदलापूर-अंबारनाथ या स्टेशनदरम्यान मालगाडीचे इंजिन बंद पडल्यामुळे शनिवारी सकाळी मध्य रेल्वेमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. 

Updated: Aug 8, 2015, 01:24 PM IST
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत title=

मुंबई : बदलापूर-अंबारनाथ या स्टेशनदरम्यान मालगाडीचे इंजिन बंद पडल्यामुळे शनिवारी सकाळी मध्य रेल्वेमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. 

कर्जतहून सीएसटीला जाणाऱ्या या मालगाडीत बदलापूर-अंबारनाथ या स्थानकांदरम्यान तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे या मार्गावरील अन्य गाड्याही अडकून पडल्यात. यामध्ये बदलापूरहून सीएसटीच्या दिशेने येणाऱ्या लोकल गाड्या आणि काही एक्स्प्रेस गाड्यांचा समावेश आहे. 

दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून इंजिनाच्या दुरूस्तीचे कार्य हाती घेण्यात आले. मात्र, वाहतूक पूर्ववत होण्यासाठी किमान दोन तास गेलेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.