www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईत एसी लोकल धावली की प्रवास सोपा होईल, असं तुम्हाला वाटत असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी... कदाचित तुमचा हा प्रवास सुखकर होईलही पण त्यासाठी तुम्हाला खिसा बराच हलका करावा लागणार आहे.
मुंबईत कधी एकदा एसी ट्रेन धावते, आणि तुमचा प्रवास सुखाचा होतो, याची वाट पहात असाल तर तुमची निराशा होण्याचीच शक्यता जास्त आहे. एसी लोकलमधून बोरिवली ते चर्चगेट या ३३ किलोमीटरच्या प्रवासासाठी एका वेळी तुम्हाला दीडशे ते दोनशे रुपये द्यावे लागणार आहेत. कोलकात्याच्या मेट्रो ट्रेनचं मात्र एवढ्याच प्रवासाचं तिकीट फक्त १४ रुपये आहे तर दिल्लीमधल्या इतक्या प्रवासासाठी ३५ रुपये मोजावे लागतात. या सगळ्याच्या तुलनेत मुंबईतल्या एसी लोकलचं तिकीट प्रचंड जास्त आहे.
एसी लोकलमध्ये महिन्याच्या पासची सुविधा मिळण्याची शक्यता जरा कमीच आहे. त्यामुळे बोरिवली ते चर्चगेट जाऊन येऊन पाचशे रुपयाची नोट सहज मोडावी लागणार आहे आणि खिसा एवढा हलका झाल्यावर मगच एसीची थंड हवा खाता येणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.