मुंबई : चिक्की घोटाळ्याप्रकरणी महिला कल्याण आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांना क्लिनचिट मिळाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यासंदर्भातील फाईलही बंद केली आहे. याबाबतचा अहवालच गृहविभागाला पाठवण्यात आला आहे.
पंकजा मुंडे यांच्या खात्याने अंगणवाडीसाठी एका दिवसात २४ कंत्राटे दिल्याबद्दल आक्षेप नोंदवण्यात आला होता. मात्र या प्रकरणात कोणताही नियम नाही. एका दिवसात किती कंत्राटे द्यावीत, असा नियम नसल्याचे म्हणत तो मंत्र्याचा आणि संबंधित विभागाचा अधिकार असल्याचे स्पष्टीकरण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिले आहे.
ACB gives clean chit to Maharashtra minister #PankajaMunde in #ChikkiScam.
— Press Trust of India (@PTI_News) December 21, 2016
कंत्राट दिले जात असताना ई-निविदा प्रक्रियेचा वापर करण्यात नाही, असा आक्षेप नोंदवण्यात आला होता. यावर कंत्राटदारांची निवड यादीतूनच करण्यात आली असल्याने ई-निविदा प्रक्रियेची आवश्यकता नाही, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
आक्षेप क्रमांक 1 - अंगणवाडीसाठी एका दिवसात 24 कंत्राटं का दिली? - असा नियम नाही, तो मंत्र्याचा किंवा विभागाचा अधिकार.
आक्षेप क्रमांक 2 - रेट कंत्राट काढताना ई-टेंडरिंगचा वापर का नाही? - कंत्राटदारांची निवड यादीतूनच, ई-टेडरिंगची गरज नाही.
आक्षेप क्रमांक 3 - गजरेपेक्षा जास्त वस्तू का मागवल्या? - महाराष्ट्रात लाखो अंगणवाड्यांना वस्तूंची गरज.
आक्षेप क्रमांक 4 - खाद्यपदार्थांची गुणवत्ता खराब का? - दोषींवर विभागाकडून तातडीने कारवाई.