मुंबई : खारघरमध्ये सहाव्या मजल्यावर घरात घुसलेल्या नागाला पकडण्यात अखेर सर्पमित्रांना यश आलंय. खारघरच्या सिंग कुटुंबियांच्या घरी सहाव्या मजल्यावर लहान मुलांच्या खेळण्याच्या बॉक्समध्य़े नाग आला होता.
खारघरच्या सेक्टर ४ मधील रेलविहारमध्ये सहाव्या मजल्यावर राहणा-या मनिष सिंग यांच्या घरात एक नाग आठवड्याभरापासून वस्तीला होता. मनिष सिंग यांच्या पत्नी अनुपमा यांना आठवडाभरापासून घरात साप असल्याचा आवाज येत होता. त्यांनी याबाबत सासू विमला सिंग यांना सांगितलं. पण घरात सर्वत्र पाहणी केल्यावरही साप आढळला नाही.
अखेर सहा दिवसांनंतर बेडरूममध्ये साप आढळला. त्यानंतर तातडीने सर्पमित्र रघुनाथ जाधव यांना बोलावण्यात आलं. पण त्यांनाही कुठे साप आढळला नाही. अखेर सातव्या दिवशी फ्रीजच्या मागे साप गेल्याचं विमला सिंग यांनी पाहिल्यावर परत जाधव यांना बोलावण्यात आलं. त्यावेळी अडीच फुटांचा हा नाग सिंग यांच्या मुलाच्या खेळण्याच्या पेटीत जाऊन बसला.
सहाव्या मजल्यावर नाग आलाच कसा असा प्रश्न पडलाय. पाईपद्वारे चढून नाग सहाव्या मजल्यापर्यंत येणं शक्य़ नाही. त्यामुळे नाग सामानातून आल्याचा दाट संशय आहे. मात्र आठवडाभरापासून घरात असलेल्या या नागाने कोणालाही दंश केला नाही याचं आश्चर्य व्यक्त केलं जातंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.