मुंबई : कुलाबा ते सीप्झ या मेट्रो तीन प्रकल्पावरून शिवसेना भाजपमधील संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत. या मेट्रो प्रकल्पाला जमीन देण्यास शिवसेनेनं नकार दिला असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांच्या ताब्यात असलेल्या नगरविकास विभागानं मेट्रो तीन प्रकल्पासाठी जमीन देण्याचे आदेश महापालिकेला दिलेत.
मेट्रो तीन प्रकल्पासाठी गिरगावसह 24 ठिकाणांची जमीन कायमची मेट्रो रेल कॉर्पोरेशनला हस्तांतरीत करायची आहे. मात्र, याला शिवसेनेनं रस्त्यावर उतरुन विरोध केला होता आणि पालिकेत सत्तेत असल्यानं जमीन देण्याचा ठराव रद्दही केला होता.
मात्र, विशेष अधिकाराचा वापर करून नगरविकास विभागानं जमीन हस्तांतरित करण्याचे आदेश महापालिकेला दिलेत. यावरून शिवसेना भाजपमध्ये आणखी संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.