राज्यात थंडीचा कडाका वाढला

राज्यात थंडीचा कडाका वाढलाय. महाराष्ट्रातलं मिनी काश्मीर म्हणून ओळखले जात असलेले महाबळेश्वर कडाक्याच्या थंडीने गारठलं असून वेण्णा लेक परिसरात ६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे वेण्णा लेक परिसरात आज पहाटे हिमकण जमा झाले होते. 

Updated: Dec 10, 2016, 09:29 AM IST
राज्यात थंडीचा कडाका वाढला title=

मुंबई : राज्यात थंडीचा कडाका वाढलाय. महाराष्ट्रातलं मिनी काश्मीर म्हणून ओळखले जात असलेले महाबळेश्वर कडाक्याच्या थंडीने गारठलं असून वेण्णा लेक परिसरात ६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे वेण्णा लेक परिसरात आज पहाटे हिमकण जमा झाले होते. 

सलग ४ दिवस सुट्ट्यामुळे देशभरातून हजारो पर्यटक महाबळेश्वर मध्ये दाखल झाले असून पर्यटकांनी गुलाबी थंडीचा आस्वाद घेत आहेत तर निफाडमध्ये यंदाच्या सर्वात कमी तापमानाची नोंद झालीये.

निफाडमध्ये पारा 6.4 अंशांवर गेलाय तर विदर्भातही थंडीचा कडाका कायम आहे. अमरावतीमध्ये 9.8 अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झालीये.