काँग्रेसचा आक्रमकपणा अंगलट, ५ आमदार दोन वर्षासाठी निलंबित

भाजपने धूर्तपणे आणि चलाखीने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर शिवसेना आणि काँग्रेस आमदार अधिक आक्रमक झालेत. राज्यपाल विद्यासागर राव विधानसभेत येत असताना धक्काबुकी झाली. यामध्ये काँग्रेस आमदारांनी अधिक आक्रमकपणा दाखविला. हा आक्रमकपणा अंगलट आला. काँग्रेसचे ५ आमदार दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले.

Updated: Nov 12, 2014, 07:17 PM IST
काँग्रेसचा आक्रमकपणा अंगलट, ५ आमदार दोन वर्षासाठी निलंबित title=

मुंबई : भाजपने धूर्तपणे आणि चलाखीने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर शिवसेना आणि काँग्रेस आमदार अधिक आक्रमक झालेत. राज्यपाल विद्यासागर राव विधानसभेत येत असताना धक्काबुकी झाली. यामध्ये काँग्रेस आमदारांनी अधिक आक्रमकपणा दाखविला. हा आक्रमकपणा अंगलट आला. काँग्रेसचे ५ आमदार दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले.

माणिकराव ठाकरे, अब्दुल सत्तार, रणजीत कांबळे, विजय वडेट्टीवार, अमर काळे, राहुल बोन्द्रे, जयकुमार गोरे यांनी धक्काबुक्की केल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, सीसीटीव्ही फुटेजमध्ये अब्दुल सत्तार, राहुल बोन्द्रे, जयकुमार गोरे, वीरेंद्र जगताप, अमर काळे यांनी धक्काबुक्की केल्याचे दिसत आहे. या पाच आमदारांना आता निलंबित करण्यात आले आहे. या आमदारांना दोन वर्षांसाठी निलंबित  केलं आहे.

विधान भवनाच्या आवारात राज्यपाल विद्यासागर राव यांना विरोधी आमदारांनी धक्काबुक्की केली. या धक्काबुक्कीमध्ये राज्यपालांच्या हाताला जखम झाल्याचं समजतंय. त्या १२ आमदारांना निलंबित करा, असा प्रस्ताव महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत मांडलाय.

माणिकराव ठाकरे, अब्दुल सत्तार, रणजीत कांबळे, विजय वडेट्टीवार, अमर काळे, राहुल बोन्द्रे, जयकुमार गोरे यांच्यासह १२ आमदारांनी राज्यपालांना धक्काबुक्की केल्याचं खडसेंनी सभागृहात सांगितलं. याबाबत सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. हे फुटेज गटनेत्यांना दाखविण्यात येऊन पुढील कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गटनेत्यांशी चर्चा केली.

अभिभाषणाच्या सुरुवातीपासूनच शिवसेना आणि काँग्रेस आमदारांनी राज्यपाल चले जावचे नारे द्यायला सुरुवात केली. संपूर्ण भाषणभर काँग्रेसच्या आमदारांची घोषणाबाजी सुरू होती. घोषणाबाजी करतच काँग्रेसच्या आमदारांनी सभात्याग केला. यावेेळीच धक्काबुक्की झाल्याचे सांगितले जात आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.