मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकत्र लढवल्याने मिळालेल्या यशानंतर आता विधानपरिषदेत भाजपला शह देण्यासाठी दोन्ही काँग्रेस पुन्हा एकत्र येणार आहेत.
विधानपरिषदेच्या एकूण 8 जागांसाठी निवडणूक होणार असून कोणी किती जागा लढवायच्या याबाबतचा निर्णय सोमवारी होणाऱ्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांमधील बैठकीत घेण्यात येणार आहे.
8 जागांपैकी 1 जागा शिवसेनेची निवडून येणार हे निश्चित असल्याने 7 जागांसाठी दोघांमध्ये चर्चा होणार आहे. दोन्ही पक्षातील नेत्यांना काही जागा बदलून हव्या आहेत, त्यासाठी कोण कोणती जागा लढवणार याबाबतची निर्णय हा या बैठकीत घेण्यात येणार आहे.
सोमवारी होणाऱ्या या बैठकीत जागावाटपाबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येईल असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.