युती तुटल्यानंतर आघाडी कशी तुटते? - काँग्रेस

काँग्रेसने विधानसभा २०१४ च्या निवडणुकीची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये ११८ उमेवदावारांना संधी देण्यात आली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीतील जागांचा तिढा सुटला नसताना काँग्रेसने आपली पहिली यादी जाहीर केली. त्यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Updated: Sep 26, 2014, 08:04 AM IST
युती तुटल्यानंतर आघाडी कशी तुटते? - काँग्रेस title=

रात्री 10 वाजता

- मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मीडियासमोर

- 15 वर्ष काँग्रेसनं राष्ट्रवादीला साथ दिली - मुख्यमंत्री

- भाजपसोबत जाण्याचा पवारांचा विचार - मुख्यमंत्र्यांचा आरोप

- 'मुख्यमंत्रीपदावर राष्ट्रवादी अडून बसली'

- राष्ट्रवादी - भाजपचं साटंलोट - चव्हाण

- 'जोगेंद्र कवाडे, समाजवादी पक्ष काँग्रेससोबत'

- राष्ट्रवादीचा निर्णय दुर्दैवी - माणिकराव ठाकरे 

- 'युती तुटल्यानंतर आघाडी कशी तुटते?'

- माणिकराव ठाकरे यांचं वक्तव्य

रात्री ८ वाजता 

- राज्यातील १५ वर्षांची आघाडी संपुष्टात, सुनील तटकरेंनी केली घोषणा 

- काँग्रेसच्या आडमुठे धोरणामुळे आघाडीत न राहण्याचा निर्णय - सुनील तटकरे 

- राज्यपालांकडे राजीनामा देणार, आघाडीचा पाठिंबा काढला - अजित पवार 

- राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना मुंबईत बोलवले, सर्व मंत्री राजीनामा देणार 

- राज्यातील राजकारणातील दुसरा भूकंप, युतीनंतर आघाडीही तुटली 

- काँग्रेस जागावाटप गंभीर नव्हता - प्रफुल्ल पटेल 

राष्ट्रवादीला निम्म्या जागा हव्या होत्या, पण काँग्रेसने दिल्या नाही - प्रफुल्ल पटेल 

२०१४ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पेक्षा राष्ट्रवादीला दुप्पट जागा - प्रफुल्ल पटेल 

प्रफुल्ल पटेल यांनी दिले आघाडी तोडण्याचे संकेत 

 

दुपारी ४ वाजून १९ वाजता 

- आघाडीही फुटीच्या उंबरठ्यावर 

- आघाडी करण्याची वेळ निघून गेली - माणिकराव ठाकरे 

- किती वाट बघत बसणार, २८८ जागांची तयारी केली - माणिकराव ठाकरे 

- राष्ट्रवादी काँग्रेसची कोअर कमिटीची बैठक संपली

- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी तुटल्याची घोषणा करू शकते. 

 

दुपारी २.५५ वाजता - 

आघाडीचाही तिढा कायम, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल दिल्लीला रवाना... काँग्रेस नेते अहमद पटेल आणि ए. के. अँटोनींची घेणार भेट

सकाळी ११.१० वाजता - 

आघाडीही तुटण्याची शक्यता, दोन्ही पक्षांची तोडगा काढण्यास टाळाटाळ... 

दोघांची २८८ जागांवर लढायची तयारी, राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू

मुंबई : काँग्रेसने विधानसभा २०१४ च्या निवडणुकीची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये ११८ उमेवदावारांना संधी देण्यात आली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीतील जागांचा तिढा सुटला नसताना काँग्रेसने आपली पहिली यादी जाहीर केली. त्यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पहिल्या यादीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे यांच्या नावाचा समावेश आहे. तर नारायण राणे यांचे पुत्र नीतेश राणे यांचे नाव या यादीत नाही.

काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी

मुंबईतील २२ उमेदवार
# दहिसर - शीतल म्हात्रे, 
# मुलुंड - चरणजितसिंग सप्रा, 
# जोगेश्‍वरी पूर्व - राजेश शर्मा,
# दिंडोशी - राजहंस सिंह,
# चारकोप - भारत पारेख, 
# मालाड पश्‍चिम - अस्लम शेख, 
# वर्सोवा - बलदेव खोसा, 
# अंधेरी पश्‍चिम - अशोक जाधव, 
# अंधेरी पश्‍चिम - सुरेश शेट्टी, 
# विलेपार्ले - कृष्णा हेगडे, 
# चांदीवली - नसिम खान, 
# घाटकोपर पश्‍चिम - प्रवीण छेडा, 
# चेंबूर - चंद्रकांत हांडोरे, 
# कलिना - कृपाशंकरसिंह,
# वांद्रे पश्‍चिम - बाबा सिद्दीकी, 
# धारावी - वर्षा गायकवाड, 
# सायन कोळीवाडा - जगन्नाथ शेट्टी, 
# वडाळा - कालिदास कोळंबकर, 
# भायखळा - मधु चव्हाण, 
# मलबार हिल - अँड.सुशीबेन शहा, 
# मुंबादेवी - अमिन पटेल, 
# कुलाबा - अँनी शेखर,

उर्वरीत राज्यातील मतदारसंघ उमेदवार

# अक्कलकुवा - अँड. के. सी. पाडवी, 
# शहादा - पद्माकर वळवी, 
# नवापूर - सुरुपसिंग नाईक, 
# साक्री - धनाजी अहिरे, 
# सिंदखेड - श्यामकांत सनेर, 
# शिरपूर - काशिराम पावरा, 
# रावेर - शिरीश चौधरी, 
# जामनेर - ज्योत्स्ना विसपुते, 
# बुलडाणा - हर्षवर्धन सपकाळ, 
# चिखली - राहुल बोंद्रे, 
# खामगाव - दिलीप सानंदा, 
# अकोट - महेश सुधाकर गणगणे, 
# बाळापूर - सय्यद नतिकोद्दिन खतिब, 
# रिसोड - अमित झनक, 
# धामणगाव रेल्वे - वीरेंद्र जगताप, 
# तिवसा - अँड.यशोमती ठाकूर, 
# मेळघाट - केवलराम काळे, 
# अचलपूर - अनिरुद्ध देशमुख, 
# आर्वी - अमर काळे, 
# देवळी - रणजित कांबळे, 
# सावनेर - सुनील केदार, 
# नागपूर दक्षिण-पश्‍चिम - प्रफुल्ल गुडधे, 
# नागपूर पश्‍चिम - विकास ठाकरे, 
# नागपूर दक्षिण - सतीश चतुर्वेदी, 
# नागपूर पू.- अभिजित वंजारी, 
# नागपूर मध्य - अनिस अहमद, 
# नागपूर उत्तर - नितीन राऊत, 
# रामटेक - सुबोध मोहिते, 
# तुमसर - प्रमोद तितरमारे, 
#साकोली - सेवक वाघाये, 
# गोंदिया - गोपालदास अग्रवाल, 
# आमगाव - रामरतनबापू राऊत, 
# आरमोरी - आनंदराव गेडाम, 
# गडचिरोली - सगुणा पेंटाराम तलांडी, 
# राजुरा - सुभाष धोटे, 
# ब्रह्मपुरी - विजय वडेट्टीवार,
# चिमूर - अविनाश वारजूरकर, 
# वणी - वामनराव कासावार, 
# राळेगाव - वसंत पुरके, 
# उमरखेड - विजय खडसे, 
# हदगाव - माधवराव पवार, 
# नांदेड उत्तर - डी.पी.सावंत, 
# नांदेड दक्षिण - ओमप्रकाश पोकर्णा, 
# देगलूर - रावसाहेब अंतापूरकर, 
# मुखेड - हनुमंतराव पाटील, 
# कळमुनरी- संतोष तराफे, 
# हिंगोली - भाऊराव पाटील, 
# जिंतूर - रामप्रसाद बोर्डीकर, 
# जालना - कैलाश गोरंट्याल, 
# सिल्लोड - अब्दुल सत्तार, 
# फुलंब्री - कल्याणराव काळे, 
# औरंगाबाद पश्‍चिम - जितेंद्र देहाडे, 
#औरंगाबाद पूर्व - राजेंद्र दर्डा, 
#वैजापूर - डॉ. दिनेश परदेशी, 
# मालेगाव मध्य - शेख रशीद, 
# नाशिक मध्य - शाहू खैरे, 
# इगतपुरी - निर्मला गावित, 
# पालघर - राजेंद्र गावित, 
# वसई - मायकेल फर्ताडो, 
# भिवंडी पश्‍चिम - शोएब गुड्ड खान, 
# ओवळा माजीवाडा - प्रभात प्रकाश पाटील, 
# ठाणे - नारायण शंकर पवार, 
# उरण - महेंद्र घरत, पेण - रवींद्र पाटील, 
# अलिबाग - मधुकर ठाकूर, 
# इंदापूर - हर्षवर्धन पाटील, 
# भोर - संग्राम थोपटे, 
# शिवाजी नगर; पुणे - विनायक निम्हण, 
# पुणे कॅन्टोंमेंट - रमेश बागवे, 
# कसबा पेठ - रोहित टिळक, 
# संगमनेर - बाळासाहेब थोरात, 
# शिर्डी - राधाकृष्ण विखे पाटील, 
# श्रीरामपूर - भाऊसाहेब कांबळे, 
# अहमदनगर शहर - सत्यजित तांबे, 
# लातूर ग्रामीण - त्र्यंबक भिसे, 
# लातूर शहर - अमित देशमुख, 
# औसा - बसवराज पाटील, 
# उमरगा - किसन कांबळे, 
# तुळजापूर - मधुकरराव चव्हाण, 
# सोलापूर उत्तर - विश्‍वनाथ चाकोते, 
# सोलापूर मध्य - प्रणिती शिंदे, 
# अक्कलकोट - सिद्धराम मेहेत्रे, 
# सोलापूर दक्षिण - दिलीप माने, 
# कराड दक्षिण - पृथ्वीराज चव्हाण, 
# राजापूर - राजेंद्र देसाई, 
# कुडाळ - नारायण राणे, 
# कोल्हापूर दक्षिण - सतेज पाटील, 
# करवीर - पी.एन.पाटील, 
# कोल्हापूर उत्तर - सत्यजित कदम, 
# हातकणंगले - जयवंत आवळे, 
# इचलकरंजी - प्रकाश आवाडे, 
# शिरोळ - सा.रे.पाटील, 
# सांगली - मदन पाटील, 
# पळुस कडेगाव -डॉ.पतंगराव कदम, 
# खानापूर - सदाशिवराव पाटील. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.