विधान परिषदेच्या सहा जागांसाठी मतमोजणी सुरु

विधान परिषदेच्या सहा जागांसाठी मतमोजणी सुरु झाली आहे. सकाळी आठच्या सुमारास मतमोजणीला सुरुवात झाली. सकाळी अकरापर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Updated: Nov 22, 2016, 09:06 AM IST
विधान परिषदेच्या सहा जागांसाठी मतमोजणी सुरु title=

मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी मतमोजणी सुरु झाली आहे. सकाळी आठच्या सुमारास मतमोजणीला सुरुवात झाली. सकाळी अकरापर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

विधान परिषदेच्या सहा जागांसाठी मतमोजणी सुरु होऊन आता तासभर उलटलाय. अकरापर्यंत चित्र स्पष्ट होईल अशी स्थिती आहे.  पुणे, नांदेड, सांगली-सातारा, भंडारा-गोंदिया, यवतमाळ आणि जळगाव या सहा जागांसाठी शनिवारी मतदान पार पडलं.

भाजप-शिवसेनेनं या निवडणुकीत युती केली होती तर काँग्रेस राष्ट्रवादी मात्र स्वतंत्रपणे लढले. त्यामुळं अनेक ठिकाणी तिरंगी सामना रंगला. आता या निवडणुकीत बाजी कोण मारणार हे आज स्पष्ट होणार आहे.