कुख्यात तस्कर बेबी पाटणकरला २ मे पर्यंत कोठडी

मुंबईतील न्यायालयाने अमली पदार्थाची कुख्यात तस्कर शकुंतला उर्फ बेबी पाटणकरला  २ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने बेबी पाटणकरला बुधवारी पनवेलमध्ये अटक केली होती.

Updated: Apr 28, 2015, 08:37 PM IST
कुख्यात तस्कर बेबी पाटणकरला २ मे पर्यंत कोठडी title=

मुंबई : मुंबईतील न्यायालयाने अमली पदार्थाची कुख्यात तस्कर शकुंतला उर्फ बेबी पाटणकरला  २ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने बेबी पाटणकरला बुधवारी पनवेलमध्ये अटक केली होती.

मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार धर्मा काळोखे याला सातारा पोलिसांनी अमली पदार्थाच्या तस्करीत अटक केल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. 

काळोखे याच्या पोलीस लॉकर मध्ये १२ किलो एमडी अमली पदार्थ आणि तब्बल सव्वा दोन कोटी रुपयांचे परदेशी चलन समोर आले होते. त्याला अमली पदार्थ पुरविणारी महिला म्हणून बेबी पाटणकरचे नाव पुढे आले होते. 

या महिलेला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांची दहा स्वतंत्र पथके कार्यरत असतानादेखील ती पोलिसांना गुंगारा देत होती. दरम्यान समाजसेवा शाखेचे पोलीस उपायुक्त प्रवीण पाटील यांना बेबी पाटणकर कुडाळहून खासगी बसने मुंबईत येत असल्याची माहिती मिळाली. 

बसमधून बेबी पाटणकरला अटक
समाजसेवा शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरिष सावंत, पोलीस निरीक्षक जगदेव कालापाड, निशिकांत विश्वकार आदींच्या पथकाने या बसचा माग घेत पनवेल येथे सापळा लावून बसमधूनच बेबी पाटणकरला अटक केली. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x