भुजबळ, निलेश राणे यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटकेत असणाऱ्या छगन भुजबळ यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. मुंबईच्या सत्र न्यायालयात ही सुनावणी होणार आहे. 15 मार्चला छगन भुजबळांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते कोठडीत आहेत.

Updated: May 11, 2016, 09:37 AM IST
भुजबळ, निलेश राणे यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी title=

मुंबई : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटकेत असणाऱ्या छगन भुजबळ यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. मुंबईच्या सत्र न्यायालयात ही सुनावणी होणार आहे. 15 मार्चला छगन भुजबळांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते कोठडीत आहेत.

दुसरीकडे संदीप सावंत या काँग्रेस कार्यकर्त्यांला झालेल्या मारहाणी प्रकरणी निलेश राणेंनी अटकपूर्व जामीनासाठी हायकोर्टात अर्ज दाखल केलाय. या अर्जावर आज सुनावणी होणार आहे. याच प्रकरणात खालच्या कोर्टात राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय. त्यामुळे निलेश राणे यांच्यावर सध्या अटकेची टांगती तलवार आहे.