वाद सामंजस्यानं सोडवा, ठाकरे बंधुंना सल्ला

बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूपत्रावरून सध्या मुंबई उच्च न्यायालयात खटला सुरू आहे. शुक्रवारी या खटल्याची सुनावणी पार पडली.

Updated: Dec 13, 2014, 10:08 AM IST
वाद सामंजस्यानं सोडवा, ठाकरे बंधुंना सल्ला title=

मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूपत्रावरून सध्या मुंबई उच्च न्यायालयात खटला सुरू आहे. शुक्रवारी या खटल्याची सुनावणी पार पडली.

यावेळी, न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी हा वाद दोन्ही बंधूंनी सामंजस्यानं सोडवण्याचा प्रयत्न करावा, असं मत व्यक्त केलं. बाळासाहेबांच्या अखेरच्या दिवसांत त्यांची मानसिक स्थिती ठिक नसताना मृत्यूपत्र तयार केल्याचा दावा जयदेव यांनी कोर्टात केलाय.

शिवसेनेचे पक्षप्रमुख व बाळासाहेबांचे चिरंजीव उद्घव ठाकरे यांनी मृत्यूपत्राला कायदेशीर स्वरूप देऊन प्रमाणपत्र मिळवण्यासाठी 'प्रोबेट पीटिशन' सादर केले आहे. तर हे मृत्यूपत्र खोटे असल्याचा दावा करत दुसरे चिरंजीव जयदेव ठाकरे यांनी 'कॅव्हिएट' अर्ज केला आहे. त्यामुळे कोर्टाने याचे रूपांतर मृत्यूपत्रासंबंधीच्या दाव्यात (टेस्टामेंटरी सूट) केले आहे.

मृत्यूपूर्वी, बाळासाहेब ठाकरे यांनी १९९७ ते २०११ दरम्यान तब्बल आठ-नऊ वेळा आपल्या मृत्यूपत्रात बदल केल्याचंही हे मृत्यूपत्र बनवण्यात मदत करणाऱ्या आणि त्यावर सही करणाऱ्या अॅड. फ्लॅनेन डिसुझा यांनी न्यायालयासमोर म्हटलं होतं.  १९९७ साली त्यांनी आपलं पहिलं मृत्यूपत्र केलं होतं. 

दरम्यान, या खटल्याची पुढील सुनावणी १७ डिसेंबरला आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.