मुंबई २६/११ हल्ला : हेडली माफीचा साक्षीदार, चार अटी मान्य

डेव्हिड कोलोमान हेडली याला मुंबई विशेष मोक्का न्यायालयाने ४ अटींवर सरकारी साक्षीदार म्हणजेच माफीचा साक्षीदार बनवले आहे. तसेच त्यांने चार अटीही मान्य केल्यात.

Updated: Dec 11, 2015, 10:28 AM IST
मुंबई २६/११ हल्ला : हेडली माफीचा साक्षीदार, चार अटी मान्य title=

मुंबई : डेव्हिड कोलोमान हेडली याला मुंबई विशेष मोक्का न्यायालयाने ४ अटींवर सरकारी साक्षीदार म्हणजेच माफीचा साक्षीदार बनवले आहे. तसेच त्यांने चार अटीही मान्य केल्यात.

अधिक वाचा : मला माफीचा साक्षीदार करा, मुंबई हल्ल्याची माहीती देतो : हेडली

माफीचा साक्षीदार हेडली झाल्याने २६/११च्या हल्ल्याचा तपासात अनेक गोष्टी पुढे येण्याची शक्यता आहे. हेडलीने चार अटी मान्य केल्याने या अटींवर आधारित २६/११ च्या दहशतवादी खटल्यायाठी डेव्हिड हेडलीची जबाब ८ फेब्रवारी २०१६ रोजी रेकॉर्ड केला जाईल. या खटल्याची पुढील सुनावणी ८ फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आली आहे.

काय आहेत या चार अटी?
१) मुंबईवर झालेल्या २६/११ या दहशतवादी हल्ल्यासंदर्भातील सर्व माहिती तुला सांगावी लागणार.

२) २६/११ दहशतवादी हल्ल्यातील तुझी काय भूमिका होती.

३) २६/११ च्या हल्ल्यातील सर्व संशयीतांबद्द्ल तू विशेष न्यायालयाला सर्व माहिती द्यायची. जी तू अमेरिका न्यायालयाला दिली आहेस ती.

४) तू माफीचा साक्षीदार झाल्यास तुला विशेष सरकारी वकील सुनावणी दरम्यान जे प्रश्न विचारतील त्याची सर्व खरी आणि स्पष्ट उत्तरे द्यावी लागतील.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.