मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर शनिवारी रात्रीपासून मेगाब्लॉक घेण्यात आलाय. तो दुसऱ्या दिवशी सकाळी ६.१५ वाजेपर्यंत असणार आहे. या दरम्यान, एकही लोकल धावणार नाही, असे स्पष्ट करण्यात आलेय. दरम्यान, मध्यरात्रीही फोर्ट ते मुलुंडदरम्यान जादा बेस्टच्या बस सोडण्यात येणार आहेत.
मध्ये रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक आल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. त्यामुळे या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी उद्या मध्यरात्रीही फोर्ट ते मुलुंडदरम्यान बेस्टकडून जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत.
रात्री १० वाजून ५० मिनिटांनी छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून शेवटची लोकल सुटणार आहे. सीएसटी ते कल्याण एसी विद्युत प्रवाहाची चाचणी होणार असल्याने रात्रीपासून ते दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी सव्वासहा वाजेपर्यंत एकही लोकल धावणार नाही. रेल्वे प्रशासनाच्या मागणीनुसार ७ मर्यादित, ३६८ मर्या., २७ व ३०२ मर्या. या मार्गांवर जादा बसगाड्या रात्री सव्वाअकरापासून सुटणारआहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.