दहीहंडीला अखेर साहसी खेळाचा दर्जा

 दहीहंडीला अखेर साहसी खेळाचा दर्जा मिळालाय. महाराष्ट्र सरकारनं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. क्रीडामंत्री विनोद तावडे लवकरच याबाबतची घोषणा करणार आहेत.

Updated: Aug 12, 2015, 04:33 PM IST
दहीहंडीला अखेर साहसी खेळाचा दर्जा title=
संग्रहीत

मुंबई : दहीहंडीला अखेर साहसी खेळाचा दर्जा मिळालाय. महाराष्ट्र सरकारनं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. क्रीडामंत्री विनोद तावडे लवकरच याबाबतची घोषणा करणार आहेत.

त्याबाबतचा जीआरही लवकरच काढण्यात येणार आहे. १२ वर्षांखालील बालगोविंदांना दहीहंडीमध्ये सहभागी होता येणार नाही, असा आदेश सुप्रीम कोर्टानं दिला होता. त्याची अंमलबजावणी सरकार करणार आहे. तर १२  ते १५ वयोगटातल्या मुलांना दहीहंडीत सहभागी होण्यासाठी आता आपल्या पालकांकडून एनओसी म्हणजे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावं लागणार आहे.

दरम्यान, दहीहंडीची उंची किती असावी, याबाबत अद्याप सरकारकडून काहीही स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.