कोकण रेल्वे मार्गावर गणपतीसाठी या विशेष गाड्या

गणपतीसाठी कोकण रेल्वे मार्गावर वाढती गर्दी लक्षात घेऊन विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. आणखी ११९ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. तर पनवेल - चिपळूण मार्गावर विशेष डेमू रेल्वे चालविण्यात येणार आहे.

Updated: Aug 12, 2015, 03:01 PM IST
कोकण रेल्वे मार्गावर गणपतीसाठी या विशेष गाड्या title=

मुंबई : गणपतीसाठी कोकण रेल्वे मार्गावर वाढती गर्दी लक्षात घेऊन विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. आणखी ११९ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. तर पनवेल - चिपळूण मार्गावर विशेष डेमू रेल्वे चालविण्यात येणार आहे.

गणेशोत्सवासाठी एलटीटी-मडगाव, एलटीटी-करमाळी आणि पनवेल-चिपळूण या ट्रेनचा समावेश आहे. एलटीटी-मडगाव स्पेशल रेल्वेच्या ३६ फेऱ्या होणार असून गुरुवार वगळता ही रेल्वे सहा दिवस धावणार आहे.

एलटीटी-मडगाव स्पेशल
रेल्वे क्रमांक ०१००५ एलटीटीहून ००.५५ वाजता सुटून मडगावला त्याच दिवशी १४.४० वाजता पोहोचेल. तर रेल्वे क्रमांक ०१००६ मडगावहून १५.२५ वाजता सुटून एलटीटीला ३.५५ वाजता पोहोचेल. ही रेल्वे ८ सप्टेंबर ते २८ सप्टेंबरपर्यंत सोडण्यात येणार आहे. 

एलटीटी-करमाळी 
एलटीटी-करमाळी या दररोज धावणाऱ्या रेल्वेच्या ४२ फेऱ्या होणार आहेत. रेल्वे क्रमांक ०१०२५ एलटीटीहून ५.३० वाजता सुटेल आणि करमाळी येथे त्याच दिवशी १७.०० वाजता पोहोचेल. ही रेल्वे ८ सप्टेंबर ते २८ सप्टेंबरपर्यंत धावेल. रेल्वे क्रमांक ०१०२६ करमाळी येथून ५.५० वाजता सुटून एलटीटी येथे त्याच दिवशी १७.४५ वाजता पोहोचेल. ९ सप्टेंबर ते २९ सप्टेंबरपर्यंत ही ट्रेन धावेल.  

पनवेल-चिपळूण डेमू रेल्वे
पनवेल-चिपळूण डेमू रेल्वेचीही घोषणा करण्यात आली. या गाडीच्या ४० फेऱ्या होणार आहेत. रेल्वे क्रमांक ०११०७ पनवेलहून ११.१० वाजता सुटून चिपळूण येथे त्याच दिवशी १६.०० वाजता पोहोचेल. रेल्वे क्रमांक ०११०८ चिपळूणहून १७.३० वाजता सुटून पनवेल येथे २२.३० वाजता पोहोचेल. 

ही रेल्वे सप्टेंबरच्या ४, ५, ६, ८, ९, ११, १२, १३, १५, १६, १७, १९, २०, २१, २३, २४, २६, २७, २९, ३० या तारखेला सोडण्यात येणार आहे. ही ट्रेन अनारक्षित असल्याचे मध्य रेल्वेकडून स्पष्ट केलेय.  या गाडीला रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामने, करंजाडी, विन्हेरे, दिवाण खवटी, खेड, अंजनी येथे थांबे देण्यात आलेत.

कोठे आहेत थांबे?
एलटीटी-मडगाव मार्गावर धावणाऱ्या गाड्यांना ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, अारवली रोड, संगमेश्वर, रत्नागिरी, अाडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी रोड, मडुरे, थिविम आणि करमाळी थांबे असणार आहेत. तर एलटीटी-करमाळी दरम्यान, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, अडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी रोड, मडुरे, पेरनेम, थिविम असे थांबे असणार आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.