दहीहंडी उत्सवात आतापर्यंत 126 गोविंदा जखमी

शहरातील दहीहंडी उत्सवात आतापर्यंत 126 गोविंदा जखमी झाले आहेत. यातील 34 गोविंदांना उपचारासाठी पालिकेच्या रुग्णालयांमध्ये दाखल करून घेण्यात आले आहे.

Updated: Aug 25, 2016, 11:57 PM IST
दहीहंडी उत्सवात आतापर्यंत 126 गोविंदा जखमी title=

मुंबई : शहरातील दहीहंडी उत्सवात आतापर्यंत 126 गोविंदा जखमी झाले आहेत. यातील 34 गोविंदांना उपचारासाठी पालिकेच्या रुग्णालयांमध्ये दाखल करून घेण्यात आले आहे.

92 गोविंदावर उपचार करून सोडून देण्यात आले आहे. व्हीएन देसाई रुग्णालयात 16 जणांवर उपचार सुरू असून इतारांवर सायन, नायर आणि केईएम रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. 

मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत जखमींची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याचं दिसून येतंय. गेल्या वर्षी तब्बल 364 गोविंदा जखमी झाले होते. कोर्टाच्या निर्णय़ामुऴं यंदा अपघाताला आळा बसल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, गोविंदा पथक उल्हासनगर 4 येथील गोविंदा पथकातील गोविंदा सुजल गडापकर  हा 13 वर्षांचा गोविंदा  गंभीर जखमी झाला. उपचारासाठी कल्याण येथील फोर्टीज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उल्हासनगर येथील लालचक्की येथे दहीहांडी फोडताना 6 व्या थरावरून पडून गोविंदा गंभीर जखमी झाला आहे. सध्या प्रकृती चिंताजनक असून त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. तर त्याचा उपचाराचा खर्च शिवसेनेने उचलला आहे.