www.24taas.com, मुंबई
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दत्ताजी नलावडे यांना आज पहाटे निधन झालंय. वयाच्या ७७ व्या वर्षी फुस्फुसाच्या प्रदीर्घ आजारानं त्यांचं निधन झालंय. त्यांच्यावर मुंबईतील जसलोक रुग्णालयात उपचार सुरू होते.
रविवारी पहाटे प्रकृती बिघडल्याने दत्ताजी नलावडे यांना जसलोक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. नलावडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळताच शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे पक्ष नेते मनोहर जोशी, आमदार रामदास कदम यांनी हॉस्पीटलमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली होती. शिवसेनेच्या जडणघडणीत नलावडे यांचा मोठा वाटा आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खास विश्वारसू नेत्यांपैकी एक नेते म्हणून दत्ताजी नलावडे ओळखले जायचे. सेनेच्या स्थापनेपासून ते शिवसेनाप्रमुखांसोबत आणि शिवसेनेसोबत एकनिष्ठ राहिले. त्यांनी मुंबईचं महापौरपद तसंच विधानसभा अध्यक्षपदही भूषवलं.