मुंबई : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, पं. ह्रदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आले.
मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात झालेल्या कार्यक्रमात डॉ. भालचंद्र नेमाडे, पंडित सुरेश तळवलकर, अभिनेता अनिल कपूर, दिलीप प्रभावळकर, कुमार केतकर, आशा कामत, अपर्णा अभ्यंकर आणि त्या तिघांची गोष्ट या नाटकाच्या टीमचा खास गौरव करण्यात आला.
लतादीदींची अनुपस्थिती आणि त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कार्यक्रमस्थळी येण्यास झालेला उशीर यामुळे प्रेक्षकांची नाराजी झाली. मात्र त्यानंतर झालेल्या सोनू निगम संगीत रजनीला प्रेक्षकांनी मनमुराद दाद दिली. सर्वच गौरवमूर्तींनी लतादीदींचे आभार मानत पुरस्काराबद्दल मनस्वी आनंद व्यक्त केला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.