चायनीय कलिंगडची मागणी वाढली

 राज्याच्या विविध भागातून नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कलिंगडची आवक वाढली आहे. त्यातच चायनीज बीज वापरुन लागवड केलेल्या चायनीय कलिंगडला बाजारामध्ये चांगली मागणी आहे.

Updated: Apr 15, 2017, 08:28 AM IST
चायनीय कलिंगडची मागणी वाढली title=

नवी मुंबई : राज्याच्या विविध भागातून नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कलिंगडची आवक वाढली आहे. त्यातच चायनीज बीज वापरुन लागवड केलेल्या चायनीय कलिंगडला बाजारामध्ये चांगली मागणी आहे.

चायनीज कलिंगडमध्ये शुगर किंग, सागर किंग, किरण, ब्लॅक बॉय नावाची कलिंगड बाजारात दाखल झाली आहेत. ही कलिंगड चवीला गोड आणि वजनाने जास्त भरतायत. त्यामुळे ग्राहकांकडून चायनीज कलिंगडची मागणी वाढतेय. यामुळे शेतक-यांनाही 8 ते 9 रुपये किलो भाव मिळत आहे. सध्या महाराष्ट्रासह कर्नाटक, चेन्नईमधून सर्वात जास्त कलिंगड बाजारात येत आहेत.