देवयानीप्रकरणी अमेरिकेच्या कंपन्या टार्गेट, मुंबईत पिझ्झा पार्लरची तोडफोड

देवयानी खोब्रागडेंना वाईट वागणूक देणा-या अमेरिकन यंत्रणांवरचा राग आता अमेरिकन कंपन्यांवर निघू लागलाय. वांद्रे इथं रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी डॉमिनोजच्या पिझ्झा पार्लरमध्ये हंगामा करून तोडफोड केली. अमेरिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी डॉमिनोजमध्ये धिंगाणी घातला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 20, 2013, 03:43 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
देवयानी खोब्रागडेंना वाईट वागणूक देणा-या अमेरिकन यंत्रणांवरचा राग आता अमेरिकन कंपन्यांवर निघू लागलाय. वांद्रे इथं रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी डॉमिनोजच्या पिझ्झा पार्लरमध्ये हंगामा करून तोडफोड केली. अमेरिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी डॉमिनोजमध्ये धिंगाणी घातला.

देवयानी खोब्रागडे प्रकरणी अमेरिकेची अडेलतट्टूपणाची भूमिका कायम आहे. देवयानी यांना अमेरिकेत मिळालेल्या वागणुकीबाबत अमेरिकन प्रशासनानं दिलगिरी व्यक्त केली असली तरी माफी मागणार नाही किंवा खटलाही मागे घेणार नाही अशी भूमिका अमेरिकेने घेतलीय. त्यामुळं हा तिढा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
याप्रकरणी अमेरिकेने गुरुवारी दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र ती पुरेशी नसल्याची प्रतिक्रिया देशात उमटली आहे. केवळ दिलगिरी नको, तर अमेरिकेनं बिनशर्त माफी मागितली पाहिजे, अशी मागणी केंद्रीय वाणिज्यमंत्री कमलनाथ यांनी केलीये. तर परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद यांनीही अमेरिका हे प्रकरण संवेदनशीलतेनं हाताळेल असं म्हटलंय. तसंच खोब्रागडेंवरचे सर्व आरोप मागे घेण्यात यावेत, अशी मागणीही भारतानं केली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ