मुंबई : मुंबईच्या समुद्रात उभारल्या जाणाऱ्या शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी पर्यावरणाची खात्याची परवानगी एका आठवड्यात मिळेल, असं मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
आज राज्यातील जे प्रकल्प पर्यावरण खात्याच्या परवानगीमुळे रखडले आहेत, त्यासंदर्भात आज चर्चा झाली.केंद्रीय पर्यावरण खात्याचे राज्यमंत्री प्रकाश जावळेकर यांच्याशी यासंदर्भात आज मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली.
मुंबईमध्ये कोळीवाडे हे सीआरझेड 3 मध्ये आहेत, त्यांना कोंडवाड्यासारखं ठेवता येणार नाही, असं मत समोर आल्याने, लवकरच सीआरझेड संदर्भात चर्चा आणि लवकरच निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
एमटीएचएल, नाव्हा शेवा प्रकल्प, कोस्टल रोड, मेट्रो 2 ची कार कारशेड, राज्यातील -विदर्भातील झुडपी जंगल प्रश्न, नवी मुंबई एअरपोर्ट, सिडकोचे प्रकल्प या प्रकल्पाबाबत ही सखोल चर्चा झाली. आता पुन्हा दिल्लीत आढाव बैठक झाल्यावर टप्प्याटप्प्याने प्रकल्प मार्गी लावू असंही त्यांनी सांगितलं.
यावर बोलतांना प्रकाश जावडेकर म्हणाले, राज्यात अनेक प्रकल्प पर्यावरण खात्याची परवानगी न मिळाल्याने थांबलेले आहेत, विकासाच्या आड आम्ही येणार नाहीत, आज राज्यातील पर्यावरणाशी संबंधित विविध प्रकल्पांवर विस्तृत चर्चा झाली, पुढील 15 दिवसानंतर पुन्हा एकदा आढावा बैठक घेत निर्णय घेऊ असं जावडेकरांनी सांगितलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.