आशियातल्या सर्वात मोठ्या महिला मॅरॅथॉनला मुंबईत सुरुवात

 आशियातल्या सर्वात मोठ्या महिला मॅरॉथॉनला मुंबईत सुरुवात झाली आबे.  झी च्या प्रादेशिक वाहिन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीशचंद्र यांनी फ्लॅग ऑफ करत स्पर्धेचा शुभारंभ केला. 'डीएनए आय कॅन रन' या महिला हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं मुंबईत दिमाखात आयोजन करण्यात आलंय.

Updated: Mar 25, 2017, 08:31 AM IST
आशियातल्या सर्वात मोठ्या महिला मॅरॅथॉनला मुंबईत सुरुवात title=

मुंबई : आशियातल्या सर्वात मोठ्या महिला मॅरॉथॉनला मुंबईत सुरुवात झाली आबे.  झी च्या प्रादेशिक वाहिन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीशचंद्र यांनी फ्लॅग ऑफ करत स्पर्धेचा शुभारंभ केला. 'डीएनए आय कॅन रन' या महिला हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं मुंबईत दिमाखात आयोजन करण्यात आलंय.

डीएनए, एलआयसी आणि हिरानंदानीनं ही स्पर्धा आयोजीत केली आहे. महिलांनी यात सहभागी होऊन इतरांना प्रेरणा द्यावी हे या मॅरेथॉनमागचं उद्धीष्ट  आहे. कॅन्सरशी दोन हात ही यंदाच्या मॅरेथॉन स्पर्धेची थीम आहे. 21 किमी, 10 किमीची स्पिरिच्यूअल रन आणि 5 किमीची फन रन अशा तीन टप्प्यात या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. हिरानंदानी यांच्यासह अनेक मान्यवर आणि सिनेतारे तारकांनी या स्पर्धेसाठी उपस्थित लावली. बिकेसी येथील बँक ऑफ बडोदा इथून या स्पर्धेला सुरुवात झाली असून याच ठिकाणी या स्पर्धेची सांगता होणार आहे.