भाजपचे दोन मंत्री मातोश्रीवर जाणार!

भाजपचे दोन वरिष्ठ मंत्री लवकरच मातोश्रीवर जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेसोबतचे वाद आणि कटुता मिटवण्यासाठी भाजपचे हे दोन मंत्री मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. 

Updated: Mar 25, 2017, 08:02 AM IST
भाजपचे दोन मंत्री मातोश्रीवर जाणार! title=

मुंबई : भाजपचे दोन वरिष्ठ मंत्री लवकरच मातोश्रीवर जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेसोबतचे वाद आणि कटुता मिटवण्यासाठी भाजपचे हे दोन मंत्री मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

या भेटीसाठी गुढीपाडव्यानंतरचा म्हणजे 29 मार्चचा मुहूर्त काढण्यात आल्याचं समजतंय. भाजपच्या कोअर कमिटीच्या गुरूवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.