पाच दिवसांच्या आंदोलनानंतर डॉक्टर कामावर रुजू

पाच दिवसांपासून संपावर असलेले निवासी डॉक्टर आज सकाळी कामावर रूजू होतायत.

Updated: Mar 25, 2017, 07:37 AM IST
पाच दिवसांच्या आंदोलनानंतर डॉक्टर कामावर रुजू  title=

मुंबई : पाच दिवसांपासून संपावर असलेले निवासी डॉक्टर आज सकाळी कामावर रूजू होतायत. अनेक ठिकाणी पहाटे सहा वाजता डॉक्टर कामावर आले आहेत. मुंबईतल्या काही रुग्णालयात सकाळी 8 वाजता डॉक्टर कामावर रुजू होत आहेत.

शुक्रवारी मुंबई हायकोर्टानं संपकरी डॉक्टरांचे कान उपटले होते. कोर्टासमोर एक सांगता आणि बाहेर जाऊन भलतंच काही तरी सांगता हा काय प्रकार आहे असं सवाल करत कोर्टाने मार्डला चांगलंच धारेवर धरलं. कोर्टानं तुमच्या कामाचं कौतुक केलं ते सगळं मागे घ्यावं लागेल असं देखील कोर्टाने निवासी डॉक्टरांना सुनावलं.

तुम्ही तुमच्या सदस्यांना कामावर रुजू व्हा हे मान्य करुन घेण्यात अपयशी ठरले आहात. तेव्हा त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय संबंधित रुग्णालयाच्या प्रशासनाने घेण्याचे आदेशही दिले आहेत. अशा कारवाईला मार्डचा आक्षेप नसल्याचं प्रतिज्ञापत्र मार्डनं कोर्टाच्या आदेशानं सादर केलं.