मुंबई : अंधेरी - वांद्रे - मानखुर्द आणि जोगेश्वरी - विक्रोळी लिंक रोड- कांजुरमार्ग मेट्रो मार्गांचे भूमिपूजन नव्या वर्षाच्या सुरुवातीला होणार आहे.
मुंबईत २ मेट्रो मार्गाचे भूमिपूजन झाल्यावर आता नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच २०१६च्या सुरुवातीला आणखी दोन मेट्रो मार्गांचे भूमिपूजन केले जाणार आहे. जोगेश्वरी - विक्रोळी लिंक रोड- कांजुरमार्ग अशा साधारण १३ किमी मार्गाचा प्रकल्प आराखडा अंतिम टप्प्यात आहे. येत्या दोन एक महिन्यात या प्रकल्पाचा आराखडा निश्चित होणार असून भूमिपूजन लवकरच केले जाणार आहे.
आता कांजुरमार्ग जागेवर मेट्रो कारशेडचा येणार हे जवळपास नक्की झाले आहे. म्हणून जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड मेट्रो ही कांजुरमार्गपर्यन्त वाढवली जाणार असून त्याचा खर्च ४००० कोटी रुपयांपर्यंक अपेक्षित आहे. यामुळे थेट पूर्व - पश्चिम उपनगर मेट्रो
तर अंधेरी - वांद्रे - मानखुर्द या मेट्रो दोन मार्गाचा उर्वरित टप्प्याचा १८ किमीचा टप्प्याचा आराखडा ३१ ऑक्टोबरपर्यंत निश्चित होत असून त्याचा भूमिपुजनाचा मार्ग मोकळा झालाय. ख-या अर्थाने मुंबईचे पूर्व - पश्चिम उपनगर जोड़णा-या मेट्रो २ मार्गाचा हा उर्वरित टप्पाच खर्च २० हजार कोटी रुपयांच्या घरात आहे.
अंधेरी - वांद्रे - मानखुर्द आणि जोगेश्वरी - विक्रोळी लिंक रोड- कांजुरमार्ग हे दोन मेट्रो मार्ग मार्गी लागल्यास मुंबईत मेट्रोचे जाळे तयार होण्यास मदत होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.