खडसेंवरील आरोप चौकशीसाठी न्यायमूर्तींची नियुक्ती

माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आलेत. या आरोपांमुळे खडसे यांना राजीनामा द्यावा लागला. या आरोप प्रकरणाची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्तींची नियुक्ती करण्यात आलेय.

Updated: Jun 22, 2016, 11:19 AM IST
खडसेंवरील आरोप चौकशीसाठी न्यायमूर्तींची नियुक्ती title=

मुंबई : माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आलेत. या आरोपांमुळे खडसे यांना राजीनामा द्यावा लागला. या आरोप प्रकरणाची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्तींची नियुक्ती करण्यात आलेय.

न्यायमूती दिनेश झोटिंग हे आता एकनाथ खडसेंप्रकरणी चौकशी करणार आहेत. दरम्यान, एकनाथ खडसे यांना एका प्रकरणात क्लिनचिट मिळाला आहे. पीए गजानन पाटील लाचप्रकरणी खडसे यांना हा दिलासा मिळालाय.

लोकायुक्त एम. एल. तहलयानी यांची एकनाथ खडसे यांना क्लिनचिट दिली आहे. कल्याणमधील जमीन प्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे सचिव गजानन पाटील यांनी ३० कोटींची लाच मागितल्याची तक्रार लोकायुक्तांकडे करण्यात आली होती.

तक्रारदार रमेश जाधव यांनी खडसेंविरोधात कारवाई व्हावी म्हणून लोकायुक्तांकडे धाव घेतली होती. मात्र खडसेंना क्लिनचिट मिळाल्यानं दिलासा मिळाला आहे.