मुंबई-ठाणेकरांसाठी 'एलिवेटेड मेट्रो'ची खुशखबर...

मुंबई - ठाणे असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही खुशखबर आहे... लवकरच वडाळा - घाटकोपर - ठाणे - कासारवडवली या मेट्रो मार्गाला परवानगी मिळणार, असं दिसतंय.

Updated: Oct 9, 2015, 11:08 AM IST
मुंबई-ठाणेकरांसाठी 'एलिवेटेड मेट्रो'ची खुशखबर... title=

मुंबई : मुंबई - ठाणे असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही खुशखबर आहे... लवकरच वडाळा - घाटकोपर - ठाणे - कासारवडवली या मेट्रो मार्गाला परवानगी मिळणार, असं दिसतंय.
 
भूमिगत मेट्रोसाठी लागणारा खर्चाचा अवाढव्य आकडा लक्षात घेता मुंबईतील मेट्रो-3चा मार्ग वगळता आता सर्व मेट्रोचे मार्ग हे एलिवेटेड म्हणजेच उन्नत असणार आहेत. तेव्हा वडाळा - घाटकोपर - ठाणे - कासारवडवली असा मेट्रोचा मार्गही उन्नत असणार आहे. सुमारे 33 किमी मेट्रो मार्गाच्या या नवीन आराखड्यावर शेवटचा हात फिरवला जात आहे. 

लवकरच हा आराखडा एमएमआरडीए मुख्यमंत्र्यांपुढे सादर करणार असून येत्या काही दिवसांत या मार्गाच्या नवीन आराखडयाला मान्यता मिळणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या भूमिपुजनाचा आणि निविदा प्रक्रिया सुरु करण्याचा मार्गही मोकळा होणार आहे. तेव्हा येत्या काही महिन्यांमध्ये मुंबई - ठाणे आणि घोडबंदर रोड यांना जोडणाऱ्या या मेट्रो मार्गाच्या कामाला सुरुवात झाली तर आश्चर्य वाटायला नको...

वडाळा - घाटकोपर - ठाणे - कासारवडवली या 33 किमीच्या 'भुयारी मेट्रो' आराखडा रद्द करत तो उन्नत केल्यामुळे प्रकल्प खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. या मार्गाच्या भुयारी मार्गाचे काम तब्बल 22,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च अपेक्षित होता. आता हा मेट्रो मार्ग एलिवेटेड केल्यामुळे प्रकल्प अंदाजे 8,000 कोटी रुपयांमध्ये पूर्ण होईल, असं सांगण्यात येतंय. 

तसंच या प्रकल्पाला पुढे वडाळा ते GPO असा नेण्यास प्राथमिक मान्यता मिळाली आहे. तेव्हा वडाळा ते GPO या आठ किमी मेट्रो मार्गाचा आराखडा बनवण्याच्या कामालाही लवकरच सुरुवात होणार आहे. त्यामुळे घोडबंदर - ठाण्याहून थेट सीएसटीपर्यंत जीवघेणा लोकल प्रवास टाळत वातानुकूलित मेट्रोने पोहचणे शक्य होऊ शकेल.
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.