मुंबईच्या पहिल्या डॉनच्या कुटुंबातच `वॉर`

मुंबई अंडरवर्ल्डमधील सर्वात पहिला डॉन हाजी मस्तानच्या घरात वारसा हक्कावरून कलह सुरू झालाय. हाजी मस्तानची मुलगी शमशादच्या विरोधात पोलिसात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 18, 2013, 09:48 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई अंडरवर्ल्डमधील सर्वात पहिला डॉन हाजी मस्तानच्या घरात वारसा हक्कावरून कलह सुरू झालाय. हाजी मस्तानची मुलगी शमशादच्या विरोधात पोलिसात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मस्तानचा दत्तक मुलगा सुन्दर शेखर याच्या तक्रारीरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. काय आहे या कलहाचं कारण?
मुंबई अडरवर्ल्डमधील पहिला डॉन हाजी मस्तान यांच्या घरात सध्या वारसा हक्कावरून कलह सूरू झालाय. हाजी मस्तानची मुलगी शमशाद सुपारीवाला आणि मस्तानचा दत्तक मुलगा सुंदर शेखर यांच्यात वारसा हक्कासाठी युद्ध सुरू झालंय. हाजी मस्तानचा दत्तक मुलगा सुंदर यांनी शमशादने बनावट कागद पत्र आणि बनावट सही करून मस्तान यांच्या भारतीय मायनॉरिटी सूरक्षा महासंघाची संपत्ती हडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केलाय.
हाजी मस्तान यांच्या संपत्तीवरुन उद्भवलेला बहिण भावाचा हा वाद आता न्यायालयात गेलाय. त्यामुळे न्यायालयाने पोलिसांना तक्रारीची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिलेत. पोलिसांनी शमशाद सुपारीवालासह 5 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय. याप्रकरणी पोलिसांनी कुणालाही अटक केलेली नाहीये. मात्र जाणकारांच्या मते हाजी मस्तानच्या पार्टीचा जो अध्यक्ष असेल तोच मस्तानच्या संपत्तीचा वारस होऊ शकणार. डॉन मस्तानची मुलगी शमशाद सुपारीवालाशी संपर्क साधन्याचा प्रयत्त केला असता त्यांच्याकडून कुठलही उत्तर मिळालं नाहीये. एकूणच डॉन हाजी मस्तान यांच्या वारसाची लढाई ही संपत्तीसाठी नसून डॉनचा खरा वारस कोण यासाठीच असल्याचं बोललं जातेय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.