तीन दिवसांनंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार - फडणवीस

अखेर शिवसेना-भाजप एकत्र येणार, अशी शक्यता आहे. एका फॉर्म्युल्यावर दोन्ही पक्षांमध्ये अखेर एकमत झालं असून नेतृत्त्वाकडून आज घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी दिलीये. 

Updated: Dec 3, 2014, 08:27 AM IST
तीन दिवसांनंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार - फडणवीस  title=

 सायंकाळी ०६:२७ वाजता

मुख्यमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि अमित शहा यांची बैठक संपली. 
रामदास आठवलेंनी आमच्यासोबत राज्यात यावे 
मुख्यमंत्री फडणवीस यांचे वक्तव्य
एकत्रित सरकार तयार करू - फडणवीस 
तीन दिवसांनंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार - फडणवीस 

दुपारी ०४:४५ वाजता

- देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदी यांची मागितली वेळ 
- संध्याकाळी मोदींची भेट घेणार 
- महाराष्ट्र सरकारमध्ये शिवसेना सहभागावर होणार चर्चा

दुपारी ०४:२४ वाजता

- अमित शहा यांच्यासोबत बैठक सुरू
- देवेंद्र फडणवीस, धर्मेंद्र प्रधान, चंद्रकांत पाटील बैठकीला हजर
- बीजेपी कार्यालयात सुरू झाली बैठक

दुपारी ०४:२३ वाजता

- देवेंद्र फडणवीस यांची धर्मेंद्र प्रधान यांच्या सोबत अर्धा तास चर्चा झाली
- प्रधान यांच्या घरू झाली चर्चा
- दोघेही एकाच गाडीत अमित शहा यांना भेटण्यासाठी निघाले

दुपारी ०२:४२ वाजता
शिवसेनेचा सत्तासहभागाचा निर्णय लांबणीवर, शिवसेना नेत्यांची बैठक संपली, निर्णयासाठी अजून दोन-तीन दिवस लागण्याची शक्यता, भाजप नेत्यांसोबत चर्चा सुरू, अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेणार- शिवसेना नेत्यांची माहिती... भाजपवर टीका करू नका, सोशल मी़डियावरीलही टीका टाळा, उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना, शिवसेना नेत्यांना स्पष्ट आदेश

दुपारी ०१:३९ वाजता

राज्य सरकारकडून तीन दिवसांचा दुखवटा जाहीर, विनोद तावडेंनी दिली माहिती. त्यामुळं मंत्रीमंडळ विस्तार लांबणीवर पडणार. 

दुपारी ०१:१२ वाजता

मंत्रीमंडळ विस्तार आता ५ तारखेला, माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांच्या निधनामुळं शपथविधी शुक्रवारी होण्याची शक्यता..

दुपारी १२.५० वाजता

शिवसेनेला अखेर १२ मंत्रिपदं मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये पाच कॅबिनेट आणि सात राज्यमंत्रिपदांचा समावेश आहे. दरम्यान, पुन्हा गृहमंत्रीपदावरून युतीचं घोडं पुन्हा अडलं. मातोश्रीवर सध्या बैठक सुरू असून शिवसेनेचे सर्व नेते मातोश्रीवर दाखल झालेत.  दरम्यान, पाच कॅबिनेट मंत्रीपदासाठी सुभाष देसाई, दिवाकर रावते, नीलम गोऱ्हे, एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांची नावं असण्याची शक्यता आहे.

 

मुंबई: अखेर शिवसेना-भाजप एकत्र येणार, अशी शक्यता आहे. एका फॉर्म्युल्यावर दोन्ही पक्षांमध्ये अखेर एकमत झालं असून नेतृत्त्वाकडून आज घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी दिलीये. 

रात्री वर्षावर झालेल्या बैठकीत एक फॉर्म्युला निश्चित झाल्याचं ते म्हणाले. दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गृह, अर्थ, महसूल आणि नगरविकास ही चारही महत्त्वाची खाती भाजप स्व:तकडेच ठेवणार असून सेनेला सार्वजनिक बांधकाम, उर्जा, उद्योग आणि सिंचन ही खाती शिवसेनेला दिली जातील. 

या व्यतिरिक्त आठ राज्यमंत्रीपदंही शिवसेनेच्या पदरात पडण्याची शक्यता आहे. भाजपकडून या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि उद्योगमंत्री प्रकाश मेहता हे उपस्थित होते तर सेनेकडून खासदार अनिल देसाई, गजानन किर्तीकर आणि सुभाष देसाई यांनी हजेरी लावली.
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.