कफ परेडमध्ये मेकर टॉवरमध्ये भीषण आग

कफ परेडमध्ये भीषण आग लागलीय. वर्ल्ड ट्रेड सेंटर जवळच्या 'मेकर टॉवर'च्या विसाव्या मजल्यावर ही आग लागलीय. 

Updated: Oct 18, 2016, 07:57 AM IST
कफ परेडमध्ये मेकर टॉवरमध्ये भीषण आग title=

मुंबई : कफ परेडमध्ये भीषण आग लागलीय. वर्ल्ड ट्रेड सेंटर जवळच्या 'मेकर टॉवर'च्या विसाव्या मजल्यावर ही आग लागलीय. 

आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्यात. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 

या आगीत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त अद्याप समोर आलेलं नाही. 

आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. सकाळी ६.३० वाजल्याच्या सुमारास ही घटना घडलीय.

आत्तापर्यंत दोन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय.