फायरमन राजेंद्र भोजने यांचा मृत्यू

अग्निशमन दलातले जवान राजेंद्र रंगनाथ भोजने यांचं पहाटे दुर्दैवी निधन झालं. 

Updated: Jan 1, 2017, 09:43 AM IST
फायरमन राजेंद्र भोजने यांचा मृत्यू

मुंबई : अग्निशमन दलातले जवान राजेंद्र रंगनाथ भोजने यांचं पहाटे दुर्दैवी निधन झालं. 

राजेंद्र हे रेसकोर्स इथे 10 डिसेंबरला एक पक्षी वाचवण्यासाठी कोलवर गेले होते. त्यावेळी बाजुने जात असलेल्या रेल्वेच्या उच्च दाबाच्या इलेक्ट्रिक वायरशी संपर्क आल्याने राजेंद्र आणि त्यांचे साथीदार गंभीर जखमी झाले होते. 

त्यांना ऐरोलीच्या बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण 21 दिवसांची त्यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. काही वेळातच भायखळा अग्निशमन केंद्रात राजेंद्र यांना शेवटची मानवंदना दिली जाणार आहे.