मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर स्वदेशी बनावटीची पहिली मेधा लोकल सुरू करण्यात आली. लोकलमधील संपुर्ण विद्युत यंत्रणा भारतीय तंत्रज्ञांनी बनवली आहे. मेधा लोकल दादर ते बोरीवली धीम्या मार्गावर दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी रवाना करण्यात आली.
‘तेजस’ ट्रेन येत्या काही दिवसांमध्ये तर ‘उदय’ ट्रेन मे महिन्यात प्रवाशांच्या सेवेसाठी रेल्वेच्या ताफ्यात दाखल होईल अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. रेल्वे संबंधीच्या विविध सोयीसुविधांचे उद्घाटन शनिवारी प्रभू यांच्या हस्ते झाले.